माहूर:-शेतातील तिळ पिकाला पाणी देत असतांना शेतात दबा देऊन बसलेल्या रानडुक्कराने शेतकरन अचानक हल्ला केल्याने हल्ल्यात हडसनी येथील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.त्याचा वर माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचचारासाठी पुसद कडे रवाना करण्यात आले आहे.
पिकांना पाणी देण्याच्या काम व्यस्त असतांना लपून बसलेल्या रानडुक्कराने बापुराव नामदेव हुम्बे रा.हडसणी या शेतकऱ्यावर हल्ला केल्याने पायाला गंभीर इजा झाली.ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील,अवधूत जाधव,कैलास काळू जाधव व इतर ग्रामस्थांचे मदतीने त्यांना तात्काळ माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.त्या ठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांना अधिक उपचारासाठी पुसद ला रवाना करण्यात आले आहे.पिढीत शेतकऱ्याने निवेदनाद्वारे वन विभागाकडून मदतीची मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत रानडुकरांच्या वाढत्या संख्येने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या पिकावर वन्य प्राण्यांचा हल्ला करून नासाडी करणे, शेतकऱ्यांवर हल्ला करणे असे अनेक प्रकारचे नुकसान या पूर्वी हडसनी परिसरात वन्य प्रण्यांकडून झाले आहे.मात्र वन विभागाने कुठलीच आर्थिक मदत केलेली नाही.असा आरोप अनिल पाटील यांनी केला आहे.