माहूर:- तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी असलेले, तालुका कृषी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय,नगर पंचायत, गट शिक्षणाधिकारी येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.
माहूर तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असल्याने या ठिकाणी असलेल्या कार्यावर आणि त्यांच्या कारभारावर वरिष्ठ अधिकारी असो वा लोकप्रतिनिधी कोणाचे ही लक्ष नसते.तालुका कृषी कार्यालयाचे कामकाज तर ‘रामभरोसे’च सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त आहे . दुय्यम अधिकारी म्हणून असलेल्या मंडळ अधिकारी पदांसह अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.कार्यालयातील सूत्रा नुसार हे सगळं वरिष्ठांच्या मर्जीने चालते. सक्षम अधिकारी नसल्याने ‘आव-जाव घर तुम्हारा है’ अशी गत आहे. यात मात्र शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे.शेतकरी केव्हाही गेल्यास कार्यालयातील मोजके कर्मचारी सोडल्यास सर्व टेबल्स रिक्तच दिसतात. शेतकऱ्यांच्या विविध योजनांची माहिती मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.नगर पंचायत ला मुख्याधिकारी विद्या ताई कदम यांच्या बडली नंतर अद्याप दोन प्रभारी कडे पदभार देण्यात आला आहे,मात्र कायम मुख्याधिकारी मिळाले ले नाही.या शिवाय शिक्षण विभागा बाबत त इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे की शिक्षक, मुख्याध्यापक,केंद्र प्रमुख,विस्तार अधिकारी,यांचे कोणालाच एकमेकांचे सोय सुतक नाही.शिक्षण विभागात अधिकारी मस्त तर शिक्षक त्रस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.ग्रामीण रुग्णालय तर मागील तब्बल सात वर्षांपासून प्रभारीवर आहे.मध्यंतरी तर चक्क तीन वर्षे एका अधीक्षकांनी माहूर नियुक्तीचा पगार खाऊन नांदेड ला आपलं चांगभलं केलं.त्या नंतर त्याची बदली झाली तेव्हा पासून पुन्हा तोच कित्ता गिरवून आरोग्य विभाग काय साध्य करत आहे देव जाणे.गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालस अधीक्षक लाभलेले नाहीत, तर वैद्यकीय अधिकाºयांची काही पदे रिक्त आहेत.फिरत्या आरोग्य पथकाच्या डॉॅक्टरांकडून दररोज बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. वेळेनंतर रुग्णांवर येथे केवळ प्रथमोपचार करून त्यांना नांदेड किंवा यवतमाळ ला पाठवण्यात येते.ग्रामीण रुग्णालयाला अनेक वर्षांपासून स्थायी अधिकारी मिळू नये, यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते असू शकते, असा प्रश्न माहूर येथील नागरिकांनी उपस्थिती केला आहे.शहरासह सर्व तालुकास्तरीय कार्यालयाचीच ही गत झाली आहे. काही कार्यालयांचे बाहेरील अधिकारीच ‘प्रभारी’ आहेत.तर काही कार्यालयात अधिकारी आहेत पण शोधून सापडत नाहीत.अपवाद ग्रामीण रुग्णालय सोडल्यास कुठल्याच कार्यालयात बायोमेट्रिक मशीन नाही त्या मुळे सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फावले आहे. बाहेरील तालुक्यास अधिकारी भेटतात. मग आपल्याच तालुक्यास का नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत यास तालुकावासीयांची सहनशिलता की लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत आहे,या बाबत ही चर्चा सुरू आहे