अहो आश्चर्यम महामार्गाच्या मंजुरी नंतर रस्ते झाले अरुंद ; माहूर नगराध्यक्षांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट! शंभर फुटाचा रस्ता न झाल्यास जन आंदोलन:- फिरोज दोसानी

माहूर:-धनोडा – माहूर – किनवट १६१ ए या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर रस्ते प्रशस्त होईल अशी अपेक्षा असताना भलतेच झाले असून माहूर शहरात अस्तित्वात आसणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा १०० फुटाचा रस्ता महामार्ग विभागाने अकलेचे तारे तोडत चक्क ७० फुटावर आणल्याने तीर्थक्षेत्र माहूर ला भविष्यात वाहतुकीचे मोठे संकट उभे टाकणार आहे. व शहराचे विद्रुपीकरण करणारा असल्याने  नागरिकांच्या तक्रारी व नागरिकांना होत असलेली गैरसोय आणि महामार्गाच्या तुघलकी कारभार या संदर्भात आज दिनांक २१ रोजी माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची भेट घेऊन तक्रारी निवेदन दिले व चर्चा केली असता जिल्हाधिकाऱ्यानी लवकरच महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
माहूर शहरात राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात वर्गीकरण करून रुंदीकरणाचे काम सुरू आहे.या कामात प्रचंड अनियमितता असल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गत महिन्यात या संदर्भात रान उठविले होते,तेव्हा कुठे सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी बैठक लावली होती.मात्र त्याचे फलित दिसून आले नाही.महामार्ग विभागाचे वरदहस्त लाभलेल्या सदर गुत्तेदाराने सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकिरन पुजार व मा.आ.प्रदीप नाईक आणि इतर नेत्यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या बैठकीत ठरल्या प्रमाणे काम न करता आपल्या मन मर्जीने केवळ पाच मीटर चा रस्ता व त्या बाजूने साडे पाच मीटर चे सर्व्हिस रोड असा ३५ फूट चा रस्ता करण्याचा घाट घातला आहे.त्या दिशेने काम ही सुरू आहे.वास्तविक पाहता राज्य मार्ग असताना माहूर शहरात १०० फूट रस्ता,मध्ये भागी दुभाजक व त्याला लागून नाली अस्तित्वात होती.महामार्ग झाल्याने हे रस्ता अधिक रुंद व्हायला पाहिजे होता,मात्र तसे न होता रस्ता होता त्या पेक्षा अरुंद केला जात आहे.दुभाजक ही अंदाज पत्रकातून हद्दपार करण्यात आले असल्याने माहूर शहराच्या वैभवात भर पडण्या ऐवजी माहूर शहरला भक्कास करण्याचा खेळ महामार्ग विभाग खेळत आहे.त्या मुळे माहूर चे नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी यांनी आज गुरुवार रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट घेऊन संपूर्ण कैफियत मांडली असता त्यांनी त्वरित महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सावत्रे यांना प्राप्त निवेदना बाबत तात्काळ दखल घ्यायला सांगितली.मात्र महामार्ग विभागात प्रत्येक्ष नगराध्यक्ष दोसानी गेले असता सावत्रे यांनी आपले कर्तव्य झटकट उपविभागीय अभियंता हटकर यांच्या कडे बोट दाखवून त्यांना नगराध्यक्षांच्या समस्या एकण्याचे फर्मान सोडले. उपविभागीय अभियंता हटकर यांनी जेव्हा रस्त्याचे अंदाजपत्रक नगराध्यक्षांना दाखविले तेव्हा फिरोज दोसानी अचंबित झाले.चक्क १०० फुटाचा रस्ता ७० फुटावर आणल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आणि त्या नंतर फुटपाथ,नाली,असा हा पोर खेळ महामार्गाणे मांडला आहे.मात्र या कडे बघण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही.हे या तालुक्याचे दुर्भाग्य आहे.
महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सावत्रे हे कधीच कुठल्याच लोकप्रतिनिधी, माध्यमांच्या प्रतिनिधीचे फोन उचलत तर नाही,कधी कामावर भेट सुद्धा देत नाहीत त्या मुळे सदर गुत्तेदारा सोबत त्यांचे आर्थिक हित संबंध तर नाही ना या शंकेला जागा आहे.खासदार हेमंत पाटील यांच्या कडून माहूर शहरवासीयांना अपेक्षा असून त्यांनी संसदेत मुद्दा उपस्थिती करावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
——— लवकरच जन आंदोलन उभारू ——-
माहूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्या साठी व तीर्थक्षेत्राला साजेसे रूप देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,ना.जयंत पाटील,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या पूर्वी ही कोट्यवधीचा निधी माहूर शहर विकासा साठी मिळाला आहे.अजून ही प्रस्ताव शासन दरबारी आहेत.असे असताना शहरातील मुख्य रस्ता इतका अरुंद आम्ही होऊ देणार नाही.१०० फूट रस्ता ताब्यात असल्याने १०० फुटात रस्ता व त्याला लागून नाली व्हावी अशी आमची मागणी आहे.असे न झाल्यास माहूर शहर बंद ठेवून प्रचंड मोठे जन आंदोलन उभारू
फिरोज दोसानी 
नगराध्यक्ष माहूर