माहूर ते सारखणी १६१ ए राज्य मार्ग बोगस कामामुळे बनला मृत्यूचा सापळा! दोन महिन्यातच उमरातांडा जवळ पडले मोठे खड्डे..!!

माहूर :- माहूर ते सारखणी १६१ए  चे काम अत्यंत निस्कृष्ठ झाल्याने अपघात नित्याचेच झाले आहे.रोडच्या दोन्ही बाजूने चुरी भरणा करावी या मागणी साठी  दि.२९/०४/२२ रोजी आष्टा फाटा येथे सकाळी ८ वाजता चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा सामजिक कार्यकर्ते अविनाश टनमने यांनी कार्यकारी अभियंता  यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
माहूर ते सारखणी १६१ ए  रोडवरील दोन्ही बाजूने पडलेली बारीक चुरी,रोडलगत दोन्ही बाजू भरणा करणे,व उमरातांडा जवळ अवघ्या दोनच महिन्यात रोड फुटला असून मोठे खड्डे पडले असल्याने अपघात होत आहे.सदर बाब कंत्राटदार यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितली असता उडवा उडवी चे उत्तर मिळत आहे.त्या मुळे ही बाब कार्यकारी अभियंता भोकर यांना कळविण्यात आली आहे.मात्र त्यांनी ही दखल न घेतल्याने पुढील होणाऱ्या अपघात संबंधित विभाग व गुत्तेदार जीवितहानीस स्वत जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.किनवट माहूर महामार्ग चे काम अत्यंत निकृष्ट होत आहे.या शिवाय केरोळी फाटा ते धनोडा पर्यंत तर वाहन चालविण्याची मोठी कसरत आहे.धूर माती मुळे  नाक कान डोळे याचे आजार होत आहे.वाईबाजार व सारखणी मार्केट असल्याने मोठी वर्दळ असते तिथे तर तत्काळ रस्त्याचा दोन्ही बाजू भर भरणे गरजेचे आहे.असे अविनाश टनमने यांनी निवेदनात नमूद केले आहे