माहूर:- देशातील सामान्य नागरिक हिंदू-मुस्लिम भेदभावाच्या पलिकडे गेला आहे. राजकारणी मंडळींना प्रत्येक टोपीखाली असलेल्या डोक्याची जात दिसत असली तरी, सामान्यांनी या टोप्या कधीच बाजूला फेकून दिल्या आहेत. समाजातील काही समाजकंटकांच्या हस्ते सोशल मीडियावर हिंदू-मुस्लिम वाद घालणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा प्रसंग माहूर येथे ग्रामीण रुग्णालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात घडला.पवित्र रमजान महिन्यातील उपवास असतांना माहूर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज़ भय्या दोसानी यांनी रक्तदान करून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश दिला.
माहूर येथे ग्रामीण रुग्णालयात आज बुधवार रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले.त्यात भव्य रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते,या शिबिरात नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना रोजा असताना सुद्धा त्यांनी व तहसीलदार किशोर यादव यांनी एकच वेळी रक्तदान देऊन रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, ते आताच्या परिस्थितीत खूप गरजेचे आहे.आपल्या रक्तदाना मुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, या भावनेने रोजा असताना रक्तदान केल्याची भावना नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी व्यक्त केले.या वेळी जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव,राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष अमित येवतिकर,सुनील आडे,नगर सेवक प्रतिनिधी रफिक सौदागर,इरफान सय्यद यांची उपस्थिती होती.