माहूर येथील आरोग्य शिबिरा कडे राजकीय बड्या नेत्या पाठोपाठ जिल्ह्यातील बडे आरोग्य अधिकारी ही फिरकले नाही; उत्कृष्ठ नियोजन मात्र प्रसार झाला नसल्याने रुग्ण संख्या नगण्य!

माहूर:- तालुक्यातील गरजु व गोरगरीब नागरीकांच्या आरोग्याची काळजी म्हणून केंद्रशासनाच्या सुचने वरून आझादी का अमृत महोत्सव तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन ग्रामीण रूग्णालय माहुर येथे आज दिनाक २० एप्रिल रोजी करण्यात आले होते,या आरोग्य मेळाव्यास ग्रामीण रुग्णालय माहूर च्या वतीने पालकमंत्री ना.अशोक चव्हाण,खा.हेमंत पाटील,आ.भीमराव केराम, या बड्या नेत्यांसह सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकिरान पुजार,यांची या मेळाव्यात अनुपस्थिती होती. तर या शिबिराचे आयोजक असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे,जिल्हा शल्य चिकित्सक नीलकंठ भोसीकर, आरोग्य उपसंचालक हेमंत कुमार बोरसे, गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे,प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी व्हि. आर. आरबडवाड,प्रभारी गट शिक्षण अधिकारी गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव पाटील हे शासकीय अधिकारी सुद्धा फिरकले नाही.त्या मुळे तहसीलदार किशोर यादव,नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव,उपजिल्हा शिवसेना प्रमुख ज्योतिबा खराटे,उपनगराध्यक्ष नाना लाड,नगर सेवक गोपू महामुने,उमेश जाधव, निरधारी जाधव,किशन दामा,रुग्ण कल्याण समिती सदस्य नंदू संतान,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही.एन भोसले यांच्या सह स्थानिक समाजसेवक,कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मध्ये या आरोग्य मेळाव्याचे औचारिक उद्घाटन संपन्न झाले.
माहूर तालुका हा दुर्गम भागात वसलेला असल्याने येथिल नागरीकांना आरोग्य मेळाव्याचा लाभ व्हावा म्हणून आरोग्य विभागाकडून कागदोपत्री गाजा वाजा करून आदिवासी,बंजारा बहुल परिसरातील गरीब रुग्णांना विविध आजारा पासून मुक्त होण्यासाठी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र या मेळाव्याचे प्रसार व प्रसार ग्रामीण भागात तर सोडा माहूर शहरात ही झाला नसल्याने या मेळाव्यात अत्यल्प रुग्णाची नोंद झालीची खंत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.तर रुग्ण कल्याण समिती सदस्य नंदू संतान यांनी बड्या नेत्यांना आणि मोठ्या अधिकाऱ्यांना माहूर चे वावडे असल्याने ते उपस्थिती राहत नाही त्यांना कार्यक्रमासाठी बोलवायचं कशाला असा सवाल उपस्थिती करून अनुपस्थिती तालुक्यातील अधिकाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजवा अशी विनंती त्यांनी तहसीलदार यांना केली.तर तहसीलदार किशोर यादव यांनी शासन विविध योजना राबवित असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना मोफत उपचार मिळावा या साठी विविध योजना राबवित आहे,त्या योजनेची माहिती करून घेत नागरिकांनी अशा शिबिराचा लाभ घ्यावा असे अहवान केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.किरण वाघमारे,यांची तर संचलन डॉ.अभिजित आंबेकर यांनी व आभार डॉ. व्ही.एन.भोसले यांनी मानले.
———– रुग्णालयात अनेक समस्या मात्र जिल्हा शल्य चिकित्सकाचे दुर्लक्ष ____
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांचे माहूर ग्रामीण रुग्णालया कडे दुर्लक्ष झाल्याने येथील रुग्ण सेवा कोलमडली आहे.कोविड काळात डॉक्टरांच्या सेवे साठी त्यांचे कौतुक झाल्याने आता माहूर येथील अनेक डॉक्टरांना आपल्या कर्तव्याचे विसर पडले आहे.त्या मुळेच गल्ली पासून दिल्ली पर्यंत रुग्णालयाच्या अंदागोंदी कारभाराच्या तक्रारी होत आहे.या शिवाय कर्तव्यावर नसताना सुद्धा काही कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले जात आहे.मात्र राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याने तक्रारींना केराची टोपली दाखवून साधी चौकशी होत नसल्याने तक्रार दार आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांना घेरणार होते मात्र ते आलेच नसल्याने मंत्रालय अथवा न्यायालयात दादा मागण्याची तय्यारी तक्रारदारानी बोलून दाखविली.