ईद का चांद बनून प्रकटले माहूर चे बाल विकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे;माहूरात बालविकास प्रकल्प पोषण पंधरवडा संपन्न!

माहूर :एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प नांदेड 3 अंतर्गत माहूर शहरा मध्ये 21 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये पोषण पंधरवडा निमित्त बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प च्या वतीने पोषण पंधरवडा निमित्त जलव्यवस्थापन, गृहभेटी मार्गदर्शन, विविध स्पर्धा ॲनिमिया प्रतिबंध व उपचार तपासणी स्थानिक पोषण आहार विषयक जनजागृती पारंपरिक पदार्थांची पाककृती स्पर्धा इत्यादी उपक्रम घेण्यात आले. दि.4 एप्रिल रोजी पोषण पंधरवडा समारोप निमित्त माहूर शहरामध्ये नगराध्यक्ष फीरोज दोसानी यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.यामध्ये किशोरी,सेविका मदतनीस यांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. जलसंवर्धन आधारित मूकनाट्य  देगलूर येथील अंगणवाडी सेविकेच्या वतिने सादर करण्यात आले.तर माहूर येथिल अंगणवाडी सेविकेच्या वतिने शालेय पोषण अभियान गीत व लघूनाटक  सादर करण्यात आले. चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा व विविध स्पर्धेच्या विजेत्यांना  नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच पोषण अभियान मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नांदेड प्रकल्प 3  ने महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावला त्यानिमित्त नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते ए. एन. एम.कचकलवार, एन.एम.खरे माहूर हदगाव देगलूर विभागातील सर्व सेविका मदतनीस यांच्यावतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील अंगवाडी सेविका  मदतनीस मोठया संख्येने उपस्थित होत्या.
_________________________
ईद का चांद बनून प्रकटले वाघमारे!
माहूर शहरातील अंगणवाड्या वर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेले बाल विकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे हे पोषण पंधरवडाच्या निमित्ताने का होईना माहूर शहरात दाखल झाले.कधीच माहूर शहरातील अपवाद वगळता कुठल्याच अंगणवाडी मधील कारभार, कुपोषण,पोषण आहार व इतर बाबतीची खातरजमा करण्यासाठी भेट न देणारे अधिकारी म्हणून त्यांची माहूर प्रशासनात ओळख आहे.एवढेच काय कोविड काळात सुद्धा अनेक  तक्रारी होऊन सुद्धा ते तालुका प्रशासनाच्या टीम मध्ये कधी दिसून आले आहे.त्यांच्यावर कोणाचे अंकुश नाही की वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याचे काही साटे लोटे आहे देव जाणो,मात्र पोषण पंधरवड्या निमित्ताने त्यांच्या अधिनिस्त असल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे दर्शन झाल्याने त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही धन्य झाल्या असाव्यात.