माहूर:- राजा सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले,व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीची कार्याकारणी जाहीर झाली असून १४ एप्रिल रोजी समितीच्या पुढाकाराने अन्नदान कार्यक्रम होणार आहे.

प्रत्येक वार्डातून,गल्लीतुन महापुरुषाच्या जयंत्या निघाल्या पाहीजेत असे मत कार्यक्रमाचे संयोजक सिध्दार्थ तामगाडगे यानी व्यक्त केले.
या संयुक्त ऊत्सव समितीच्या अध्यक्षपदी-अदित्य खंदारे यांची तर सचिवपदी दत्ता कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.तर ऊपाध्यक्ष राहूल गायकवाड, सहसचीव-चंद्रकांत पाटील, कोषाध्यक्ष-प्रविन कांबळे,सहकोषाध्यक्ष प्रदिप बनसोडे-योगेश शेलूकार, संघटक-संघपाल भगत, निमंत्रकपदी- प्रतिक कांबळे यांची तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष-शंकर कांबळे -यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व त्याना पुढील वाटचालीस वार्डामधील ऊपासक, ऊपासिका तर्फे सदिच्छा देण्यात आल्या-या कार्यक्रमाला तालूक्यातील सर्व प्रशासकीय आधिकारी व जेष्ठ नागरीकाना निमत्रीत करण्यात येनार आहे.
