खा.शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; हल्ला पूर्व नियोजित कट असल्याने छुप्या शक्तीचा शोध लावा: मागणी

माहूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  अध्यक्ष व देशाचे नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सिल्वर ओक घरावरील हल्ला पूर्व नियोजित कट असुन छुप्या शक्तीने एस-टि कर्मचाऱ्यांच्या आडुण केला हा हल्ला असल्याने या मागील सुञधारांचा शोध घेऊण योग ती कार्यवाही करण्या बाबत माहूर तहसिल कार्यालय  येथे निवेदन देण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या सिल्वर ओक या घरावर दगडफेक व चप्पल फेक करत हल्ला केला. याप्रकरणी राज्य भर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन सुरू आहे.माहूर मध्ये ही आज नायब तहसीलदार व्यंकट गोविंदवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर
 रा.काँ.ता.अध्यक्ष मेघराजजी जाधव, नगराध्यक्ष फिरोजभैया दोसाणी,ता.यु.अध्यक्ष मारोती रेकुलवार,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अमित सुरेशसिंह येवतिकर, विनोद राठोड,के.जी.राठोड,कुंदन राठोड, अनिल पाटील हडसणीकर, अरविंद राठोड देविराज जाधव, प्रेम चव्हाण,
रफिक सोदागर, आसिफ पटेल,इरफान सय्यद अफसर अली, सुमित खडसे, रुषिकेश खडसे, शे.आरीफ, इरशाद भाई, ओम पाटिल राऊत, सय्यद किरमानी, अब्दुल रहेमान  विकास राठोड यांची उपस्थिती होती.

आमचे नेते,राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय असून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार यांनी सातत्याने बैठका घेतल्या होत्या ते कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आहेत.मात्र काही मंडळीनी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
फिरोज दोसानी 
नगराध्यक्ष माहूर