आंदोलनकर्त्यांना फूस लावून त्यांची माथी भडकवणाऱ्यांचा सूत्रधाराचा शोध घ्या:- मारोती रेकुलवार

माहूर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर एसटी आंदोलकांनी हल्ला केला. हे कृत्य अतिशय निंदनीय असून याचा आम्ही निषेध करतो. तसेच दगडफेक करण्यामागील सूत्रधार कोण, याचा पोलिसांनी शोध घ्यावा,अशी मागणी माहूर तालुका युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष मारोती रेकुलवार यांनी केली आहे.

एसटी महामंडळाच्या विलीगीकारणासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी असभ्य वर्तन केले.या आंदोलनकर्त्यांना फूस लावून त्यांची माथी भडकवणाऱ्यांचा खरा सूत्रधार कोण याचा शोध घेऊन तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रेकुलवार यांनी केली आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात असा प्रकार कधीही घडला नाही. या आंदोलनाशविाय राज्यात यापूर्वी अनेक आंदोलने झाली. मात्र नेत्याच्या घरावर चाल करून दगडफेक करण्यासारखा निंदनीय प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही.एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात असा प्रकार कधीही घडला नाही. या आंदोलनाशविाय राज्यात यापूर्वी अनेक आंदोलने झाली. मात्र नेत्याच्या घरावर चाल करून दगडफेक करण्यासारखा निंदनीय प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही. “गेली अनेक वर्षे संयम बाळगला, आता मात्र आमच्या नेत्यांवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही,’’ असा इशारा ही त्यांनी दिला आहे.या वेळी युवक शहराध्यक्ष अमित येवतिकर, अभिजित हिवळनिकर,नगर सेवक प्रतिनिधी रफिक सौदागर,इरफान सय्यद,सुमित खडसे,रियाज शेख,राजू चव्हाण यांच्या सह अनेकाची उपस्थिती होती .