माहूर(सरफराज दोसानी):- रमजान म्हणजे ‘बरकती’ परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. हा महिना आणि हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा मानला जातो,तर हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा मराठी नववर्ष ची सुरवात होते, योगायोगाने यंदा सर्वधर्मसमभावाचं तत्व अधोरेखित करणारा क्षण एकाच वेळी आला आहे.विशेष म्हणजे रमजान ईद सुद्धा साडे तीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्तावर अर्थात अक्षय तृतीय ला आल्याने हा महिना भक्तिभवाचा असणार आहे.
कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणून सर्वधर्मीय सण उत्सव मागील दोन वर्षापासून साधेपणाने साजरे करण्यात येत आहे.काही राजकारणी हिंदू खतरे में, मुस्लीम खतरे में म्हणत आपली राजकीय पोळी शेकून घेत असले तरी हिंदू मुस्लिम या देशात एकोप्याने नांदत असतात याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक्ता मे एकता ही भारतीयांची ओळख असल्याने निसर्गालाही या भूमीवर जात पात धर्म भेद मंजूर नसल्याने की काय मुस्लिम धर्मियांची पवित्र रमजान महिना व हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र आज दिनांक ०२ एप्रिल पासून एकाच दिवशी सुरू झाला आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस,याच तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो.तर दिनांक ३ मे रोजी अक्षय तृतीया ला रमजान ईद ही साजरी होणार होणार आहे.वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हटले जाते. हिंदू पंचागांनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त असतो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते. तसेच या दिवशी केलेले शुभ काम कधीच क्षय होत नाही त्यामुळे याला अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष महत्व प्राप्त आहे, तर वर्षभर समस्त मुस्लिम बांधव ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो ‘रमजान ईद’ चा सण ही त्याच दिवशी असून आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची रमजान ईद ची ओळख आहे.रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्यावर आनंद खुललेला दिसतो. बंधुभावाचा हा सण शत्रुला देखील जवळ करा असा संदेश प्रवाहीत करतो. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा करण्याकरता एकत्र येतात. अल्लाहा प्रती नमाज अदा केली जाते व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देतात.मात्र मागील दोन वर्षांपासून ईदगाह वा मशिदीत नमाज अदा करायला कोरोना पार्श्वभूमीवर निर्बंध आल्याने इद ची नमाज मुस्लिम बांधव घरीच आदा करीत होते,यंदा निर्बंध हटल्याने इदगाह वर नमाज अदा होणार आहे.