आकाशात दिसला रहस्य मय प्रकाश; चर्चेला उधाण!

माहूर(सरफराज दोसानी):- आकाशात दिसलेल्या विशिष्ट आकारच्या आणि प्रकाशमान होणाऱ्या वस्तुमुळे माहूर तालुक्यातील लांजी,सह परिसरात सध्या चर्चेला उधाण आला आहे.

माहूर तालुक्यातील लांजी व परिसरात सायंकाळी ७:३० वाजे च्या सुमारास आकाशात एक अद्भुत नजारा दिसला.दिसलेल्या रहस्यमय प्रकाशाचं एकीकडे गूढ आहे,तर दुसरी कडे काही स्थानिक कुतुहूल व्यक्त करत असताना काही जण मात्र गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.सध्या समाज माध्यमावर हा व्हिडिओ वायरल झाल्याने नागरिकात तऱ्हा तऱ्हा च्या चर्चा सुरू असून कोणीही या बाबत ठाम पणे काही सांगू शकत नसल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे