संघर्षमय प्रवासातून निशा झाली पीएसआय! माहूर तालुक्यात तालुक्यातील हरडप गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

माहूर(सरफराज दोसानी):- माहूर तालुक्यातील हरडप येथील निशा दिलीप गवळी हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे. आयोगाच्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये ओ बी सी प्रवर्गातील मुली मधून तिने ९ वा क्रमांक पटकावला आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण असून निशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निशा चे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण तिने वाई बाजार व माहूर येथील श्री रेणुका देवी महाविद्यालयातून झाले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.सलग अभ्यास करून आयोगाच्या परीक्षेची अंतिम फेरी तिने पूर्ण केली.दरम्यान २०२० मध्ये वडिलांचे निधन झाले.त्यापश्चात कुटुंबामध्ये आईसोबत मोठा भाऊ,वैनी,लहान बहिणी यांचा समावेश आहे.त्यांच्या जीवनाच्या या संघर्षमय प्रवासात निशाने आशेचा किरण दाखविला असून तिच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निशाणे पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी मिळविलेली असून यानंतर स्पर्धा परीक्षेची तय्यारी करणाऱ्या मुलांना इच्छित ध्येयात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्याचा तिने मानस व्यक्त करून दाखवला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी जिद्द व परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. तसेच ध्येय निश्चित करून त्यानुसारच तयारी केली पाहिजे. 
निशा दिलीप गवळी