सीड्स व फर्टिलायझर असोसिएशन च्या माहूर तालुकाध्यक्ष पदी कुंदन राठोड यांची निवड!

माहूर:- माहूर तालुका सीड्स व फर्टिलायझर असोसिएशन च्या अध्यक्ष पदी कुंदन राठोड यांची तर उपाध्यक्ष पदी अनुप गेंटलवार,सचिव पदी दत्तात्रय शेरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

माहूर व वाई बाजार सीड्स व फर्टिलायझर असोसिएशन ची वार्षिक बैठक आज दिनांक १४ रोजी वाई बाजार येथे पार पडली.या बैठकीत सीड्स व फर्टिलायझर दुकानदाराणी उद्भवणाऱ्या विविध समस्येवर साधक बाधक चर्चा करून सीड्स व फर्टिलायझर असोसिएशन ची नूतन कार्यकारणी सर्वानुमते जाहीर केली.या वेळी तालुक्यातील कृषी केंद्र संचालक उपस्थित होते.