माहूर:-मृत व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप देता येईल.या साठी ‘गाव तेथे स्मशानभूमी’ या जिल्हा प्रशासनाच्या अभियाना अंतर्गत माहूर तालुक्यातील २६ गावात नवीन समशान भूमी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या फेसबुक पेज वरून प्राप्त झाली आहे.मात्र तालुक्यातील मौजे लिंबायत पूरबाधित गावाच्या पुनर्वसित वसाहतीला समशान भूमी चा मागील २० वर्षाचा तिढा अजून सुटला नसून घोषित २६ गावात लिंबायत चा समावेश नसल्याने तेथील समशान भूमी चा प्रश्न मात्र कायामच आहे.

माहूर तालुक्यातील मौजे लिंबायत नेर गावाचे सन १९८३ मध्ये पूरबाधित गाव म्हणून पुनर्वसन करण्यात आले होते.तेव्हापासून आजतागायत या गावाला प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध झाल्या नव्हत्या. पुनर्वसन च्या वेळेस स्मशानभूमीची जागा आरक्षित न ठेवल्याने या गावातील समशान भूमी चा प्रश्न वादातीत राहून नेहमी कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा ठरत आहे.वर्षानुवर्षापासून येथील ग्रामस्थ समशान भूमी च्या मागणीसाठी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. प्रशासनाने या संदर्भात ठोस पाऊल उचलावीत अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
