नांदेड तेज च्या वृताची दखल, माहूर वळण रस्त्याची मलमपट्टी!

माहूर:- माहूर वळण रस्ता बद दे बद्दतर झाल्या संदर्भात नांदेड तेज ने दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जनहितार्थ वृत प्रकाशित केले होते.या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी सुरू केली असून त्या मुळे बऱ्याच प्रमाणात रस्त्यावरील खड्डयांची समस्या दूर झाली आहे.
माहूर वळण रस्ता बनला मृत्यूचा सापळा,दुचाकी चालकांची तारेवरची कसरत या मथळ्या खाली नांदेड तेज ने दिनांक 28 फेब्रुवारी रोजी वृत प्रकाशित झाले होते.धानोडा – माहूर हा 5 कि.मी.चा वळण रस्ता अतिशय खराब झाला असून अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला होता. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकास फार मोठी कसरत करावी लागत होती. सदर चा रस्ता चाळणी झाल्याने दुचाकी धारक यांचे अपघात नित्याचेच झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे या कडे साफ दुर्लक्ष केले होते.परिणामी किरकोळ अपघात नित्याचेच झाले होते.धानोडा –  माहूर – किनवट  महामार्ग रस्ता रूंदीकरणाचे काम रखडले असून या रस्त्याची अक्षरश: खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. गाडीचे अर्धे चाक खड्ड्यात जाईल एवढे मोठे खड्डे या मार्गावर पडले आहे.रस्ता होवो अथवा न होवो रस्त्यावरील खड्डे तरी मुजवावेत,अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकां-मधून व्यक्त केली जात होती.या रस्त्याची दुर्दशा पाहता डाग डुजी ऐवजी नूतनीकरण करणे गरजेचे होते.मात्र सध्या डाग डुजी करण्यात आली आहे,त्यात ही वाहन धारक समाधानी असल्याचे दिसून येते.