श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन!

माहूर:- दरवर्षी प्रमाणे शहरातील आबासाहेब पारवेकर नगर मध्ये फाल्गुन शुध्द षष्टी दि.८ मार्च २०२२ रोजी मंगळवार पासून श्री. श्री. श्री. १००८ श्री. महंत ज्ञानेश्वर भारती महाराज ( ह.भ.प.बाळू महाराज काकाणी), श्री. ह.भ.प. परसराम महाराज पवार यांच्या मधूर वाणीतून श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
दि. ८ मार्च रोजी स.भ.प.बाळू महाराज काकाणी यांचे हस्ते भागवत ग्रंथाचे पूजन करून भागवत कथेला सुरवात करण्यात आली असून भागवत सप्ताह काळात दररोज सकाळी ६ ते १० यावेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ४ भागवत कथा, सायंकाळी साडे पाच ते साडे सहा हरिपाठ, रात्री आठ ते दहा यावेळेत किर्तणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दि. १५ मार्च ह.भ.प. बाळू महाराज यांचे काल्याचे कीर्तणा नंतर महाप्रसादाने भागवत ची सांगता होणार असून जास्तीत जास्तं भक्तजनांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.