माहूर पोलिसांनी शितफितीने पकडले मोटार सायकल चोर! उरुस मोहत्सवातून चोरट्यांनी दोन दुचाकी केल्या होत्या लंपास!

माहूर:- माहूर शहरातील दिनांक ५ ते १० पर्यंत चालणाऱ्या प्रसिद्ध सोनापिर बाबा उरूस मोहत्सवातून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्या होत्या,या प्रकरणी माहूर पोलीस गुन्हा नोंद करण्यात आला होता.पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी उरूस मोहत्सवात सध्या वेशात कर्मचारी नेमून रचलेल्या सापळ्यात दोन मोटार सायकल चोरटे माहूर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहे.
माहूर शहरात सुरू असलेल्या उरूस यात्रा मध्ये असलेल्या गर्दीच्या फायदा घेत मोटार सायकल चोर सय्यद अजिमोद्दीन सय्यद नसिरोद्दिन राहणार दिग्रस याने माहूर येथील सहकारी शेख अमजद शेख मौला यांच्या सह दोन मोटार सायकल चोरले होते.त्यांनी पोलीस तपासात हिरो होंडा स्पेलंदर,बजाज डिस्कवर या दोन गाड्या चोरी केल्याची कबुली माहूर पोलिसांना दिली आहे.माहूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव रीठे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार जमादार आडे,होमगार्ड रज्जाक शेख यांनी सापडा रचून ही कार्यवाही केली.