मनोज कीर्तने यांना “समाज रत्न” पुरस्कार जाहीर! माईंड गलॅक्सी च्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रातील १० लोकांना देण्यात येतो ‘राष्ट्रीय पुरस्कार!

माहूर:- दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या १० व्यक्तींना माईंड गलॅक्सी बहुउद्देशीय संस्थेकडून पुरस्कार दिले जातात.ग्रामीण भागातील सामाजिक व अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम निष्ठेने व समर्पित भावनेने करत असल्या बद्दल माहूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांना या वर्षी २०२२ चा “समाज रत्न” पुरस्कार जाहीर झाला आहे.

माहूर तालुक्यातील दत्तमांजरी गावातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मनोज कीर्तने यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम मोठ्या प्रमाणात आहे.ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी सुद्धा आहेत.माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी, बंजारा बहुल क्षेत्रातील गावात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग होत असतात. विशेषः गणेश उत्सवात त्यांचे विविध मंडळा कडून प्रयोग आयोजित केले जातात.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष डॉ. जगदीश राठोड,संयोजक प्रा.डॉ. प्रदीप पंडीत, प्रा.डॉ.बी.डब्ल्यू.गायकवाड आणि श्रीमती इंदू रवी यांनी मनोज कीर्तने यांना “समाज रत्न” पुरस्कार जाहीर केला आहे.दिनाक १३ मार्च २२ रोज रविवार,सकाळी ठिक १२ वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मध्यवर्ती कार्यालय, दादर मुंबई (पूर्व) येथे हा पुरस्कार वितरण सोहळा नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष भालचंद्र मुणगेकर यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पार पडणार आहे.