माहूर:- परिस’ ही काल्पनिक वस्तू आपण ऐकून आहोत, या वस्तूचा लोखंडाला स्पर्श झाला तर ती वस्तू लोखंडाचे सोने करते. परंतु, माजी आमदार प्रदीप नाईक यांचे नेतृत्व इतक्या उच्च प्रतीचे आहे की, ते लोखंडाला नुसतच सोने करत नाहीत, तर ते त्या लोखंडालाच आपले गुणधर्म देऊन टाकतात. म्हणजेच लोखंडाचे सोने न करता परिसच करून टाकतात, म्हणूनच त्यांच्या अवतीभवती त्यांच्या परिसस्पर्शाने जीवनाचे सोने झाले असंख्य कार्यकर्ते, नेते समाजात दिसतात.त्या पैकी एक असलेले माहूर चे माजी सभापती मारोती बंडू रेकुलवार यांचा आज ३८ वा वाढदिवस….
कोणताही राजकीय व सामाजिक वारसा नसताना केवळ सामाजिक ध्यास व आत्मविश्वास, धडाडी आणि कर्तृत्वाच्या जोरावर राजकारणात अल्पावधीतच यशस्वी झालेला तालुक्यातील मन्नेरवारलू समाजातील चेहरा म्हणून मारोती बंडू रेकुलवार हे जनमानसात परिचित आहेत. राजकारणात प्रवेश करताच त्यांनी लांजी ग्राम पंचायत निवडणुकीत एक तर्फी विजय मिळवत प्रथम सरपंच व नंतर पंचायत समिती सभापती पद आपल्या पदरात पाडून घेत मारोती रेकुलवार यांनी समाजमनात आपल्या कार्य कर्तृत्ववाच्या जोरावर स्थान निर्माण करण्या बरोबरच युवक राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून युवकांची फळी निर्माण केली आहे.अत्यंत कमी वयात संघटन कौशल्याची चुणूक दाखवत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनात माहूर तालुक्यात युवकांच्या राजकारणात त्यांनी प्रभावी मुंसडी मारली.सामान्य कार्यकर्त्याची कामे करण्याचा आनंद व कार्यकर्त्याच्या सुख दु:खात धावुन जाण्याची स्वभावशैली सरपंच ते सभापती पदाच्या प्रवासानंतर आजही कायम आहे.
बोलणे कमी मात्र संयमाने मने जिंकणे अन दररोज जीवाला जीव देणारे देणारे कार्यकर्ते जोडण्यात जणु त्यांचा हातखंडाच.मारोती भाऊंचा व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा पैलू म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन.प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख, चढ-उतार, यश-अपयश येतेच.परिस्थितीला वश होऊन अनेकांना आपल्या ध्येयापासून परावृत्त होताना आपण पाहतो. परंतु, मारोती भाऊंचा लढणे हा स्थायीभावच. समस्या अडचण कितीही मोठी असो न डगमगता ध्येयाने त्या अडचणींना समस्यांना सामोरे जाणे, हे तर त्यांचे रोजचेच काम! अनेक अडचणी, समस्यांना तोंड देत त्यांनी हे यश गाठले आहे. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानादेखील प्रदीप नाईक यांनी दिलेली “लिफ्ट” व कठोर परिश्रम,मेहनतीमुळे राजकीय प्रवासात ते यशस्वी झाले आहेत.आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या कडे युवा नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.अपेक्षित नवीन निर्माण होणारा लखमापूर गट असो या इतर ठिकाणी मा.आ.प्रदीप नाईकानी आदेश दिल्यास निवडणूक रिंगणात आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर ते नशीब अजमाऊ शकतात.अशा या सर्वमान्य लोकमान्य नेतृत्वास ईश्वर निरोगी दीर्घ आयुष्य देवो. त्यांच्या हातून, देश, धर्म, राज्य, समाजाची अशीच उत्तरोत्तर सेवा घडो या सदिच्छांसह मारोती रेकुलवार भाऊंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा….
सरफराज दोसानी
माहूर