माहूर गडावरील श्री रेणुका मंदिर पायथ्याशी भीषण आग; अग्निशामक दल वेळेवर पोहचल्यामुळे मोठी दुर्घटना टळली!

माहूर:- जंगलातील वणवा थेट मंदिर पायथ्या पर्यंत पोहचल्याने गडावरील दुकानाला आगी मुळे धोका निर्माण झाला होता.वेळेवर माहूर नगर पंचायत चे अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहचल्याने गडावरील ११० दुकाने सुदैवाने आगी पासून बचावली व मोठी दुर्घटना टळली आहे.
माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान च्या पायथ्याशी ११० लघु व्यवसायिकांची हार,फुल, प्रसाद,खेळणी अशा विविध प्रकारच्या व्यवसायातून आपली उपजिविका भागवत आहे.माहूर गडा ला लागूनच जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये वनवा लागणे हा प्रकार दर वर्षी नित्याचाच झाला आहे. आज दिनांक ०१ मंगळवार रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास माहूरगडावर अचानक आग लागली.आगीने रौद्र रूप धारण केलं होते, यावेळी शहरातील माहूर नगरपंचायत ची अग्निशामक वेळेवर दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. माहूर नगरपंचायत चे अग्निशमन दल, कर्मचारी वेळेवर हजर झाल्यात्यामुळे तिसऱ्यांदा गडावर लागलेली आग आटोक्यात आली.गडावर आग लागल्याचे समजताच माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नगर सेवक प्रतिनिधी रणधीर पाटील,इरफान सय्यद, काँग्रेसचे कार्यकर्ते राजू सौंदलकर,व्यापारी असोसिएशन चे सचिव संजय आराध्ये, काँग्रेसचे नगरसेवक विलास भंडारी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तानुभाई, शेख नबी साहब,विशाल शिंदे व रेणुका माऊली व्यापाऱ्यांचे सदस्य घटना स्थळी तत्काळ पोहचले. या वेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा व अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश जाधव,विजय शिंदे,जोतिबा खडसे,अविनाश रुणवाल ,प्रविण शेंडे,तसेच वनविभागाचे  वनरक्षक अमोल गेडाम,डाके,सुरज चव्हाण यांचा रेणुका माऊली माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने सत्कार करून नगर पंचायत प्रशासनाचे आभार मानण्यात आले