माहूर:- शिक्षक भारती संघटनेचे नेते आदरणिय मोहन जाधव सर व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा म.प्रा.शि.संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर जगताप सर यांना नांदेड जिल्हा परीषदेचा प्रतिष्ठेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षक भारती परीवार माहूरच्या वतीने त्यांच्या निवास्थानी सदीच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला.दोन्हीही सत्कार मुर्तीचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शासन मार्फत दिला जाणारा जिल्हा परिषद नांदेड आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होऊन ही कोविड-19 या महामारी च्या काळामध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होऊ शकले नव्हते, काल रविवार दिनांक २७ रोजी सदर पुरस्काराचे वितरण झाले.आज सोमवारी रोजी सायंकाळी ६ शिक्षक भारती चे माहूर तालुकाध्यक्ष अरविंद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अजय राठोड, कार्याध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव राजदीप कोकरे, कोषाध्यक्ष दिपक सावरकर, उपाध्यक्ष आशिष माहूरे, संघटक धनाजी मुंडकर, सुभाष चलवदे, सहसचिव ज्ञानेश्वर माणिकामे, विष्णु राऊत, प्रसिद्धी प्रमुख मोमीन सर व माने सर आष्टा यांची उपस्थिती होती.