मोहन जाधव व दिगांबर जगताप यांना ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान!

माहूर:- माहूर तालुक्यातील गुंडवळ येथे कार्यरत असलेले मोहन जाधव सर यांना २०१९ -२० चा तर लखमापूर येथे कार्यरत असलेले दिगांबर जगताप सर यांना २०२० – २१ चा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार आज रविवार दिनांक २७ रोजी नांदेड शहरातील कुसुम सभागृहात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सौ. बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.