महामार्गाच्या कामात पाणी पुरवठ्याची मुख्य पाईप लाईन फुटली; शहराचा पाणी पुरवठा धोक्‍यात येण्याची शक्यता!

माहूर:- शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाखाली शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन रस्त्याचे काम करणाऱ्या निस्क्रिय गुत्तेदाराकडून रस्ता खोदत असताना फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा धोक्‍यात येण्याची शक्यता आहे.नूतन नगराध्यक्ष फिरोज दोसानी, व पाणी पुरवठा सभापती अशोक खडसे,नगर सेवक प्रतिनिधी रणधीर पाटील यांनी जाय मोक्यावर जाऊन पाहणी केली असून उद्या सबंधित गुत्तेदाराला या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..
माहूर शहरातील टी पॉइंट जवळ महामार्गाचे काम सुरू आहे.याच भागात रस्त्यांचे खोदकाम करत असताना रस्त्याच्या खाली टाकण्यात आलेले माहूर शहर पाणीपुरवठा योजने चे पाईप फुटले.परिणामी हजारो लिटर पाण्याची नासाडी तर झाली,शिवाय शहर पाणीपुरवठा धोक्यात आला आहे. सदर  गुत्तेदाराणी मनमानी चालवली असून मागील दीड वर्षात जगो जागी केवळ रस्ते खोदून ठेऊन नागरिकांना वेठीस धरले आहे.विशेष म्हणजे या पूर्वी ही याच गुत्तेदाराने कोट्यावध रुपयांचे स्ट्रीट लाईट चे पोल व त्या वरील लख प्रकाश देणारे लाईट काढून घेतले आहे.लाईट व  पोल कुठे ठेवण्यात आले,ते सुखरूप आहे की त्या समानाला भांगराची वाट दाखविण्यात आली या बाबत अद्याप विश्वासनिय माहिती मिळाली नसली तरी नगर पंचायत प्रशासन कडे ही याचे समर्पक उत्तर नाही.गुत्तेदाराने कोणाच्या परवानगीने ते लाईट चे खांब काढले याची ही नवनिर्वाचित नगर पंचायत बॉडी ने चौकशी करणे गरजेचे आहे.प्रभारी मुख्याधीकारी किशोर यादव,कार्यालाईन अधीक्षक वैजनाथ स्वामी व अभियंता प्रतीक नाईक यांच्या कडे उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत विषयांतर करून पदाधिकारी व नगर सेवका कडून या बाबत माहिती विचारण्यात येऊ शकते.सध्या तरी प्रभाग क्रमांक 13 मधील फुटलेल्या पाईप लाईनचा प्रश्न गंभीर असून एन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरातील पाणी पुरवठा धोक्‍यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.