माहूर येथे पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन!

माहूर:- जागतिक आरोग्य संघटनेच्यामाध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पोलिओ निर्मुलन मोहिमेंतर्गत ग्रामीण रुग्णालयात पोलिओ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.तर माहूर शहरातील नगरपंचायत येथे प्रातिनिधीक स्वरुपात नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन निरजा विजय शिंदे या बालकाला पोलिओ पाजून करण्यात आले.राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम महत्वाची मोहीम असून आपल्या घरातील आणि परिसरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ बूथवर नेऊन लस पाजून घेण्यात यावी असे आवाहन या वेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले.

शहरात नगर पंचायत,अंगणवाडी केंद्र १५,नवी अबादी शाळा,समाज मंदिर,अंगणवाडी केंद्र १२, टी पॉइंट,आबासाहेब पारवेकर नगर,ग्रामीण रुग्णालय माहूर,बस स्थानक,श्री रेणुका देवी मंदिर,दत्त शिखर येथे पोलिओ लसीकरण बूथ निर्माण करण्यात आले आहे.माहूर शहरात एकूण ११ बूथ वर पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून एक मोबाईल पथक ही तय्यार करण्यात आले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन.भोसले यांनी सांगितले.या वेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी,नगरपंचायत चे आरोग्य सभापती विजय कामटकर,रुग्ण कल्याण समिती सदस्य नंदू संतान,किशन राठोड,डॉ उदय कान्नव, डॉ.अभिजित आंबेकर,आरोग्य कर्मचारी के.के.स्वामी, मनवर,एन.एस.राठोड,यांची उपस्थिती होती.