दिगांबर जगताप यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर !

माहूर:- कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर लांबलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला आता मूहृत मिळाला आहे.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आतूरतेने वाट पाहत असलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे उद्या रविवारी नांदेड येथे वितरण होणार आहे.

सन २०२०-२०२१ च्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी माहूर तालुक्यातील लखमापूर येथील जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक दिगांबर जगताप यांची निवड झाली असून उद्या दिनांक २७ रोजी सकाळी ९;३० वाजता कुसुम सभागृह आय.टी.एम. नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेत व जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर चा पुरस्कार दिगंबर जगताप यांचा सपत्नीक सत्कार करून प्रदान करण्यात येणार आहे.जगताप यांची पुरस्कारासाठी निवड झाल्या बद्दल माहूर तालुक्यात सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.