मिरवणूक व अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप! हरडप येथील शिवप्रेमी बांधवांचा स्तुत्य उपक्रम!

माहूर(हाजी कादर दोसानी):- पारंपरिक मिरवणूक, डी.जे.,बॅनर,ढोलताशे यांना फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य तालुक्यातील मौजे हरडप येथील शिवप्रेमी बांधवांनी डिजे, मिरवणूक न काढता अनावश्यक खर्च न टाळून  स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थ्यांना 150 नग पाण्याची वाटर बॅग भेट देऊन खरी शिव विचाराची जयंती साजरी केली.
महापुरुषांच्या जयंती- पुण्यतिथीनिमित्त आयोजित मिरवणूक, शोभायात्रांवर मोठय़ा प्रमाणात खर्च केला जातो. एरव्ही या अनाठायी खर्चाकडे कुणी फारसे गांभीर्यानं बघत नाही; कोविड १९ नंतर मात्र ग्रामीण भागात निर्माण झालेली परिस्थिती, दिवसे दिवस बिकट होत असलेली आर्थिक स्थिती, दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होत असताना, या समस्येकडे सामाजिक जाणिवेतून बघण्याची गरज आहे. या कामी पुढाकार घेतला आहे, तालुक्यातील हरडप गावातील नागरिकांनी.गावातील शिवविचाराचे पाईक असलेले अमोल टनमने,दिपक किनाके,अविनाश टनमने,श्याम टनमने,संदिप टनमने, धनराज मोहोवार,कुलदिप राठोड, ओम टनमने, चेतन महल्ले,परिक्षीत टनमने, पंकज टनमने, गणेश टनमने,प्रमोद नरवाडे, वेदांत टनमने, राजेश पाटील, सुरज ठाकरे, कुणाल राठोड,संकेत राठोड, सौरभ कुर्मेलकर, जय सतिष टनमने, निलेश टनमने,यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य मिरवणूक न काढता अनावश्यक खर्च टाळून स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थ्यांना 150 नग पाण्याची वाटर बॅग भेट दिली.व पालक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चात हातभार लावला.यावेळी शाळेतील शिक्षक के. डी.कदम,सचिन बटाले,सचिन शहाणे,सरपंच,गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.