इंडीयन आयडल फ्रेम स्वरूप खान सारखानी येथील लेंगी स्पर्धेचे मुख्य आकर्षण! सेवालाल जयंती चे औचित्य साधून दरवर्षी करण्यात येते लेंगी स्पर्धेचे आयोजन!

माहूर(सरफराज दोसानी):- बंजारा समाजाची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी व बंजारा समाजाच्या रीती,परंपरा,बोली भाषा आणि सणासुदीला होणारे पारंपरिक कार्यक्रम अखंड पार पडले पाहिजे या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष विशाल जाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षी सारखानी येथे सेवालाल जयंती चे औचित्य साधून लेंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.गत वर्षी सैराट फेम आर्ची या स्पर्धेची मुख्य आकर्षण होती,तर या वर्षी इंडीयन आयडल फ्रेम,पिके चित्रपटाचे बॉलिवूड सिंगर स्वरूप खान,बंजारा फोक सिंगर डॉ. कलाश्री भिक्षू नाईक,बंजारा सिंगर संगीता जाधव,तेलगू गायिका अश्विनी राठोड हे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
सारखणी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सव दीपोत्सव निमित्ताने लेंगी चे स्पर्धेचे आयोजन 27 फेब्रुवारी व 28 फेब्रुवारी 2022 रोजी या कार्यक्रमाचे निमित्त विविध धार्मिक व संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या तर जीप सदस्य समाधान जाधव,युवा नेते कपिल नाईक,जीप सदस्या सूनयना जाधव,निर्माते निर्देशक संजीव कुमार राठोड,यांच्या सह या वेळी विविध मान्यवरांची उपस्थितीती राहणार आहे. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल जाधव यांनी केले आहे.
लेंगी स्पर्धेत राज्यातील व पर राज्यातील लेंगी नृत्य संच परंपरागत बंजारा समाजाची वेशभूषा परिधान करून आपल्या कले चे प्रदर्शन करतात.या लोकप्रिय बंजारा नृत्य प्रकारातून बंजारा समाजाची रूढी परंपरांचे महत्त्व तरुण वर्गाला कळते. हा  हेतू, व सामाजिक बांधिलकीतून आपण दर वर्षी हा कार्यक्रम घेत असतो असे आयोजक विशाल जाधव यांनी सांगितले.