विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत महामार्ग व संबंधित विभागवार कार्यवाही करा;वंचित बहुजन आघाडी

माहूर:- राष्ट्रीय महामार्ग ३६१ धनोडा ते कोठारी या मार्गाचे काम चालू होऊन २ वर्ष झाले परंतु काम पूर्ण झालेले नाही. माहूर शहरातील स्टेट बैंक ते न्यायालय हा अधिक वर्दळीचा भाग असून या रस्त्यावर खोदकाम करून ही दीड वर्ष झाली आहे. सध्या एकेरी मार्गाने शहरात वाहतूक चालू आहे.कासव गती ने होत असलेल्या रस्त्याचा कामात अनेक तक्रारी नंतर ही सुधारणा झाली नसल्याने काल दिनांक २४ गुरुवारी एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत महामार्ग व संबंधित विभागवार कार्यवाही करा अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी माहूर चे दादाराव गायकवाड व विजय भगत यांनी तहसीलदार माहुर यांना आज दिले आहे.
माहूर शहरातून राष्ट्रीय राज्य मार्ग जात असून सदर मार्ग मागील दीड ते दोन वर्षापासून एका बाजूने खोदून ठेवला आहे.शहरात चालू असलेल्या रस्त्यांच्या कामा बाबत अनेक वेळा माध्यमातून आवाज उठविण्यात आला मात्र कामे हाती घेणारे गुत्तेदार आणि कामावर नियंत्रण असलेले नांदेड महामार्गाचे अधिकारी यांच्या मध्ये असलेल्या मधुर हित संबंधामुळे या कडे कोणी ढुंकून बघण्यास तय्यार नाही तर पुढारी हे प्रलंबीत पडलेल्या रस्त्या संदर्भात ब्र शब्द काढण्यास तय्यार नाही,परिणामी काल गुरुवारी शिकवणी वर्गाला दुचाकी वर जात असलेल्या यश बाळू चिल्लेकर वय १८ वर्ष रा.माहूर या १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला रेतीच्या टीप्पर ने दिलेल्या धडकेत आपला जीव गमवावा लागला.विशेष म्हणजे या रस्त्यावर चोरट्या मार्गाने रेती वाहतूक करणारे टिपर व जड़ वाहने अति वेगाने चालत असल्यामुळे कित्तेक नागरिकांना या पूर्वी अपंगत्व स्वीकारावे लागले आहे.या रस्त्याची जबाबदारी असलेल्या महामार्ग विभागाने शहरातील निर्मानधिन रस्त्याचा कामाकडे साफ दुर्लक्ष केले असल्याने निष्पाप एका विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेची सखोल चौकशी करून सबंधित दोषी अढळणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी तहसीलदार माहूर यांना देण्यात आलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडी चे दादाराव गायकवाड व विजय भगत यांनी केली आहे.