
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री ना नवाब मलिक यांचेवर केंद्र सरकारने राजकीय आकसापोटी ई डि च्या माध्यमातून सूडबुद्धीने कारवाई केली आहे. ही अटक अतिशय निंदनीय असून याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहूर तालुक्याच्या वतीने निषेध करीत आहोत,भाजपा तथा केंद्र सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. ईडीचा दुरुपयोग करुन विविध राज्यात व देशात चूकीचा पायंडा पाडत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. जनतेने निवडून दिलेले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. केंद्रातील भाजपा सरकार मनमानी कारभार व हुकूमशाही पध्दतीने,सूडबुध्दीने ईडीचा गैरवापर करीत आहे.इडीचा अशाच प्रकारे गैरवापर होत राहिल्यास राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती मोहदयाना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, माजी सभापती हाजी उस्माण खाँ पठान, नगराध्यक्ष फिरोज भैया दोसाणी ,युवक तालुका अध्यक्ष मारोती रेकुलवार,प्रदेश कार्यकारणी सदस्य भगवानराव जोगदंड सर शहराध्यक्ष अमित येवतिकर, मनोज किर्तने,विनोद राठोड,रेणुकादास पंडित,अनिल पाटिल हडसणीकर, मुनाफ पटेल, नबी साहाब,रियाज शेख,नगरसेवक अशोकजी खडसे रणधिरजी पाटिल, रफिकभाई सौदागर, इरफान सय्यद, प्रतिक कोपुलवार, प्रतिक कांबळे, आशु पठाण, सय्यद आरीफ, सलीम शेख,जब्बार साईवाले,अकील अख्तर, बहाद्दुरभाई, दिपक बैस, विकास राठोड,प्रेम चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख आसिफ पटेल,ओम राऊत पाटिल,युवक शहर उपाध्यक्ष राजुभाऊ चव्हाण,सलमान शेख,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर चे निवेदन तहसीलदार किशोर यादव यांनी स्वीकारले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व हाय हाय, ईडी प्रशासकाचा निषेध असो, बीजेपी सरकार मुर्दाबाद,इडी झाली वेडी, “भाजप सरकार हमसे डरटी है ई. डी.को आगे करती है” अशा घोषणा देण्यात आल्या.माहूर पोलिसांनी या वेळी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
