किनवट तालुक्यात गुन्हेगारीला डोके वर काढू देणार नाही:निसार तांबोळी!

किनवट:-नांदेड जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट शहरासह किनवट माहूर दोन्ही तालुक्यातील दोन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व भागातील पाच पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीला डोके वर काढू दिले जाणार नाही.पोलीस प्रशासन हे जनतेच्या संरक्षणासाठी आहे त्यामुळे कोणीही असुरक्षित समजू नये असा विश्वास किनवट दौऱ्यावर आलेले पोलीस विभागाचे उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पात्रकारांशी संवाद साधतांना दिला. या वेळी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचा किनवट तालुक्याच्या वतीने सत्कार करून विविध मागण्यांचे निवेदन दिले.

किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचा किनवट येथील पोलीस स्टेशन येथे सत्कार करून तालुक्यातील विविध समस्या बोकाळले ले अवैध धंदे या बाबत निवेदन देऊन चर्चा केली असता ते म्हणाले की, माझे किनवट या भागाकडे विशेष लक्ष असून आपण दिलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली जाईल नागरिकांच्या सुरक्षेला व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आमच्या विभागाचे कर्तव्य असल्याचे पोलीस विभागाचे उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी स्पष्ट केले.पत्रकारांच्या वतीने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना त्यांनी सकारात्मक उत्तरे देऊन उपस्थितांचे त्यांनी समाधान केले, या या वेळी त्यांच्यासमवेत नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे ,भोकर परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, किनवट उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळंके सह इस्लापूर, मांडवी, सिंदखेड, माहूर, किनवट या पाच पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर कदम पाटील व सचिव प्रकाश कारलेवाड यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.निसार तांबोळी यांना मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात तालुक्यातील वाढती गुन्हेगारी,रेती तस्कर, गुटखा तस्करी,सागवान जातीचे लाकूड तस्करी,गौण खनिजांची तस्करी,जुगार,मटका,अवैध दारू विक्री,असे अनेक अवैध धंदे च्या माध्यमातून वाढती गुन्हेगारी अवैध प्रवासी वाहतूक,आशा विविध समस्या बाबत अवगत केले असता निसार तांबोळी यांनी पत्रकारांना आपण स्वतः जातीने लक्ष घालू व किनवट शहरासह तालुक्यात गुन्हेगारीला डोके वर काढू दिले जाणार नाही असे सांगितले.यावेळी पत्रकार संघटनेचे मुख्य सल्लागार माजी नगराध्यक्ष के मूर्ती ज्येष्ठ पत्रकार फुलाजी गरड जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वाकोडीकर जिल्हा उपाध्यक्ष किशन भोयर प्रमोद पोहरकर त्र्यंबक पुनवटकर दिनेश चव्हाण दुर्गादास राठोड किरण ठाकरे, शिवम पडलवार आदी उपस्थित होते.naned tej