ग्रामीण रुग्णालय माहूर येथे ताणतणाव मुक्त मानसिक आरोग्य शिबीर कार्यक्रम संपन्न!

माहूर:- गुरूगोविंद सिंगजी स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड,जिल्हा मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम(प्रेरणा  प्रकल्प) अंतर्गत आज दिनांक २२ रोजी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात ताणतणाव मुक्त मानसिक आरोग्य शिबीर कार्यक्रम संपन्न झाला.
favicon
या वेळी मानसोपचार तज्ञ डॉ. शाहू शिराढोंनकर,समोपदेशक डॉ वाघमारे,सुधा टेकुळे,गौरव येवले यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थतीना तणावमुक्त जीवन जगण्याचे मूलमंत्र देत तणाव ग्रस्त लोकांनी सतत कामे करणे टाळा,विश्रांती घ्यावी सकारात्मक विचार करावा व्यसनापासून दूर राहावे असे सांगितले.यावेळी डॉ. किरण कुमार वाघमारे,डॉ.अभिजित आंबेकर, डॉ.उदय कान्नव,डॉ.श्रीदेवी मुंगीलवार,डॉ.एस.बी. चौधरी,एस. डी. सोळूखे,के.बी. चिरडे, डी.डी.मुळे,एच. के. कुमरे,एस.वाय.कावळे,जी.जे. काळे,आर. के.साबळे,पी.डी. शेंडे,एम.एस.शिवशेट्टे यांची उपस्थिती होती.naned tej