गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता निर्माण करा:- धनंजय सुर्यवंशी

माहूर:- आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता निर्माण करून ‘ग्राऊंड लेव्हल’वर माेर्चेबांधणी करा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांनी केले.
माहूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दिनांक २२ मंगळवार रोजी दुपारी ३ वाजता माहूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बैठक संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी तर मंचावर जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील जोमदे,माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,युवक अध्यक्ष मारोती रेकुलवार,सरचिटणीस मनोज कीर्तने, प्रा.भगवान राव जोगदंड पाटील यांची उपस्थिती होती.
या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना धनंजय सुर्यवंशी म्हणाले की, येणाऱ्या आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून युवकांची मोठी व मजबूत फळी निर्माण करण्यासाठी संघटन मजबूत करणे गरजेचे आहे,त्या साठी गावा गावात वाड्या-तांड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार पोहचविण्यासाठी शाखा निर्माण केलं जाणार आहे.मागील १५ वर्षात किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात, वाड्या, पाड्यांवरील रस्ते तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस मुळे विकास झाला आहे.जिल्ह्यात किनवट माहूर ही दोन्ही तालुके राष्ट्रवादी काँग्रेसचे गड राहिले आहे.या पुढे ही प्रदीप नाईक यांच्या मागे युवकांची शक्ती उभी करण्यासाठी लवकरच राज्याचे प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांचा दौरा आयोजित करून शेकडो युवकांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविकातून माहूर तालुक्यातील युवकांचे संघटन व केलेल्या कार्याचा आलेख युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मारोती रेकुळलवार यांनी मांडला.तर तालुकाध्यक्ष मेघराज जाधव यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या काळात झालेली विकास कामे,पक्षा कडून असलेल्या अपेक्षा या बाबत आपल्या विशेष शैलीत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार शहराध्यक्ष अमित येवतिकर यांनी मानले.या वेळी किनवट तालुका युवक अध्यक्ष अजित साबळे,बालाजी बामणे,उपसरपंच चिंटू जाधव,नगर सेवक प्रतिनिधी रफिक सौदागर,रणधीर पाटील,इरफान सय्यद,सुमित खडसे,आशिफ शेख,अनिल पाटील हडसनिकर,सरपंच अवधूत पाटील,अभिजित राठोड,जीवन राठोड,ओम पाटील,शाहरुख शेख,प्रीतीश कांबळे, सैयद आरिफ,रियाज भाई,शैफाली आशू, प्रेम राठोड,राजू चव्हाण, अपसर आली,विकास राठोड,धनंजय अरध्ये,इरफान शेख,यांच्या अनेकांची उपस्थिती होती.युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांनी बैठकी पूर्वी स्थानिक विश्राम गृहात माजी आमदार प्रदीप नाईक यांची भेट घेऊन चर्चा केली.naned tej