माहूर:- नुकत्याच संपन्न झालेल्या माहूर नगर पंचायत निवडणुकी नंतर आज दिनांक २१ रोजी नगर पंचायत विषय समित्यांची सकाळी ११ वाजता निवड व त्या नंतर दुपारी ३ वाजता नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडणार होती,मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने पिठासिन अधिकाऱ्याला पत्र देऊन ही निवड पुढे ढकलण्याची विनंती केल्याने स्वीकृत सदस्यांची निवड लांबणीवर पडली आहे.

माहूर नगर पंचायत मध्ये स्वीकृत सदस्यांच्या दोन जागा आहेत.राष्ट्रवादी व काँग्रेस कडे संख्याबळ असल्याने दोन्ही पक्षा कडून एक एक स्वीकृत नगर सेवकाची निवड प्रशासनाकडून प्राप्त कार्यक्रमा नुसार करण्यात येईल असे वाटले होते.परंतु सदस्यांच्या नावावर एक मत न झाल्याने की काय दोन्ही पक्षा कडून पिठासिन अधिकाऱ्या कडे निवड पुढे ढकलण्यासाठी पत्र देण्यात आले.त्यात पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या व नगर सेवकांच्या नावाचं निमित्त करण्यात आला आहे.मात्र ग्यांनबाची मेख वेगळीच असून काँग्रेस कडून इच्छुकांची संख्या अर्धा डजन असल्या ने अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत स्वीकृत नगर सेवक निवडीचा फटका बसू नये म्हणून आज ची नियोजित निवड लांबणीवर घालण्यात आल्याची चर्चा आहे.तर राष्ट्रवादी कडे ही मोठ्या प्रमाणात लॉबिंग केल्या जात असल्याने त्यांनी पण हा विषय काँग्रेस प्रमाणे लांबणीवर घातला असावा असा कयास धरल्या जात आहे.
