माहूर नगर पंचायत विषय समित्यांची निवड बिनविरोध!

माहूर:- नगरपंचायतच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नियोजन व विकास सभापतीपदी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड , सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बिलकिस बी अहमद आली, तर पाणी पुरवठा व जलनि:स्सारण सभापतीपदी राष्ट्रवादीचे अशोक खडसे,स्वच्छता विषयक वैद्यकीय व आरोग्य सभापतीपदी शिवसेनेचे विजय कामटकर, महिला व बालकल्याण सभापतीपदी कॉंग्रेसच्या सागर राठोड, यांची आज दिनांक २१ सोमवार रोजी विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 65 मधील तरतूदीनूसार व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक नियम 2006, अन्वये विषय समित्या गठीत करणे व समित्यांवर परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करणे व विषय समितीच्या सभापतीची निवडणूक घेणे,स्थायी समिती गठीत करणे यासाठी पिठासीन अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार किशोर यादव,नगर पंचायत चे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी,अभियंता प्रतीक नाईक यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या विशेष सभेत माहूर नगर पंचायत विषय समित्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.एकूण ६ विशेष समित्या पैकी राष्ट्रवादी ३,शिवसेना २,काँग्रेस १ अशा विषय समित्या तिन्ही पक्षाच्या वाट्यावर आल्या.या वेळी नवनियुक्त सभापतींचा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,तहसीलदार किशोर यादव,यांनी सत्कार केला.naned tej