माहूर:- तालुक्यातील अनंतवाडी केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांची दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळ व दुपार सत्रात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अनंतवाडी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.
या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन, माहूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे, पंचायत समिती माहूर चे गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव पाटील, वानोळा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर गुट्टे, समन्वयक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोकले यांनी केले .या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस अनंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख , केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक उपस्थित होते या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून केंद्रप्रमुख सुरेश मोकले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अनंतवाडी येथे सकाळी 11 वा सुरुवात झाली. सुरुवातीला दिगडी धा . येथील शाळेतील पाचव्या वर्गातील विद्यार्थिनी स्नेहल दिगांबर लोहकरे यांनी 214 गुण प्राप्त करून शिष्यवृत्तीधारक झाली त्यामुळे आजच्या शिक्षण परिषदेत तेथील वर्गशिक्षक मारुती टेकाळे यांचा सत्कार करुन अभिनंदन केले त्याचप्रमाणे अनंतवाडी केंद्रातील कर्तारसिंग तांडा येथील मुख्याध्यापक दत्ता पहाडे यांनी लोकसहभागातून शाळेच्या पायाभूत सुविधा, वृक्षारोपण व शाळेचे सुशोभीकरण केले त्यास अंदाजे 80 ते 85 हजार रुपयाचे काम शाळेचे गावाच्या सहकार्याने केल्यामुळे त्यांचेही या शिक्षण परिषदेमध्ये सत्कार करून अभिनंदन केले.यानंतर शिक्षण आपल्या दारी या उपक्रमात गणित व भाषा विषयाचे मोडूल चा आधार घेऊन केंद्रप्रमुख सुरेश मोकले यांनी सर्व शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले त्यात निष्ठा 3.0 चे नवीनकुमार अरगुलवार , वाचन विकास कार्यक्रमावर संतोष किडे यांनी, गोष्टीचा शनिवार यावर रमेश चव्हाण यांनी, स्वाध्याय वर साहेबराव पटेकर व शिकू आनंदे यावर अर्चना पवळे तर आजादी का अमृत महोत्सव यावर दत्ता पहाडे यांनी शाळेत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली व सर्वांना मार्गदर्शन केले .माहूर पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय सौ. अनिताताई विश्वनाथराव कदम, वानोळा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ राठोड, विश्वनाथराव कदम माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती माहूर, बीट वानोळा चे शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर गुट्टे व आनंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोकले यांचे अनंतवाडी अंतर्गत सर्व शाळांना वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन व सहकार्यामुळे अनंतवाडी केंद्रातील सर्वच शैक्षणिक व भौतिक दृष्ट्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंतवाडी केंद्राचे सहाय्यक शिक्षक संतोष किडे यांनी केले तर आभार महादापूर शाळेचे मुख्याध्यापक रुखमाजी गलांडे यांनी मानले. ही शिक्षण परिषद उत्साहात पार पडली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक अशीच माहुरे, येथील सहाय्यक शिक्षक प्रकाश आंबेराव, संतोष किडे, माधव शिंदे, चंद्रकांत डुमने, नवीनकुमार अरगुलवार आदींनी परिश्रम घेतले.
