माहूर:- लातूर शहरातील २०१८ रोजी झालेल्या एका खून प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी गुरुवारी ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ह्या संपूर्ण खून प्रकरणाचा तपास सध्या माहुर येथे कार्यरत असलेले अण्णासाहेब पवार यांनी लावला होता. या बद्दल पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी त्यांचे कौतुक केले.

१६ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या एका खून प्रकरणात लातूर येथे तत्कालीन पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले व या खून प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून अण्णासाहेब पवार यांनी या खून प्रकरणाचा मोठ्या शिताफीने छडा लावण्यात यश मिळविलेले. सध्या माहूर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले अण्णासाहेब पवार यांच्यावर त्यांच्या या कौतुकास्पद कार्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळत असून पालीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी यांच्या कार्याबद्दल वैयक्तिकरीत्या विशेष शाबासकी दिली आहे. तर विजय कबाडे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, विजय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी माहुर तसेच सध्या माहुर पोलीस स्टेशनला त्यांचे वरिष्ठ असलेले पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी त्यांचे विशेष कौतुक केलेले आहे. माहुर पालीस स्टेशनला एक कर्तव्यदक्ष दबंग पोलीस अधिकारी एपीआय पवार यांच्या रूपाने मिळाल्याने माहूर परिसरातील गुन्हेगारीवर निश्चितच लगाम बसणार असून सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
