माहूर:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज दिनांक १९ शनिवार रोजी सायंकाळी प्रभाग क्रमांक १५ मधील इल्लू चौक येथे मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीचे जंगी स्वागत करून मिरवणुकीतील मावळ्यांना शीतपेयांच्या दोन हजार बाटली चे वाटप करण्यात आले.

माहूर येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद चौधरी,सचिव गणेश वाडेकर,विशाल पाटील,विनोद सुर्यवंशी,विकास कपाटे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने शाल व पुष्पहार घालून हाजी रउफ सौदागर,मुनाफ पटेल,शकील शाहा,रफिक सौदागर,मोहम्मद हानिफ, सय्यद अहमेद ,रियाज शेख,अहमद आली,बाबर अहमद,अकील शेख,इलियास बावानी,कयुम शेख,इरफान कालुत,लाला कुरेशी,रफिक घानिवाला,रजिक शेख, नगर सेवक प्रतिनिधी रफिक सौदागर,इरफान सय्यद, अप्सर आली,सरफराज दोसानी यांच्या सह नगर सेवक अशोक खडसे,देविदास सिडाम,रणधीर पाटील यांनी सत्कार केला.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली असून,यानुसार नूतन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या कल्पनेतून मुस्लिम समाजाच्या लोकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना संभाजी ब्रिगेड चे विशाल पाटील यांनी व्यक्त केली.तर माजी उपनगराध्यक्ष मुनाफ पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.त्यांनी जात, पंथ, धर्म असा भेदभाव कधी मानला नाही. अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. यामध्ये मुस्लिम समाज बांधवांचा देखील वाटा होता. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे मुस्लिम व्यक्तींकडे मोठ्या विश्वासाने सोपवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास समाजा-समाजात कधी दुरावा व तेढ निर्माण होणार नाही. शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन त्यांच्या विचार अंगीकारण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या वेळी मुस्लिम समाजाच्या वतीने मिरवणुकीतील मावळ्यांना शीतपेयांच्या दोन हजार बाटली चे वाटप करण्यात आले.
