माहूर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आमने – सामने;शिवसेने सह काँग्रेस ने अन्य एक अर्ज घेतला मागे!

माहूर:- माहूर नगर पंचायत अध्यक्ष पदाकरीता दाखल झालेल्या एकूण ०४ पैकी आज दिनांक ११ अर्ज परत घेण्याच्या दिवशी काँग्रेस ने दोन पैकी एक तर शिवसेने आपला एकमेव असे दोन अर्ज परत घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अमाने – सामने आले आहे.
माहूर नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ७ काँग्रेस ६ शिवसेना ३ व भाजपा १ असे पक्षीय बलाबल आहे.अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीत एकमत न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस कडून दोन व शिवसेने एक असे स्वतंत्र अर्ज दाखल केले होते.आज अर्ज परत घेण्याच्या दिवशी काँग्रेस ने दाखल केलेल्या दोन अर्जा पैकी  विलास भंडारे यांचा तर शिवसेने कडून आशा ताई निराधारी जाधव यांनी आपला एकमेव अर्ज परत घेतला.त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून फिरोज दोसाणी व काँग्रेस कडून प्रा.राजेंद्र केशवे यांचा अर्ज शिल्लक राहिला आहे.वास्तविक आज काँग्रेस चे दोन्ही व शिवसेनेचा आलेला एकमेव अर्ज परत होऊन महाविकास आघाडी ची खरी महूर्त मेढ रोवण्याची आयती संधी तिन्ही घटक पक्षातील नेत्यांना मिळाली होती.आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने हा सोने पर सुहागा योग होता,मात्र या संधीचे सोने करण्यात नांदेड जिल्हा काँग्रेस ने स्थानिक माहूर काँग्रेस च्या पुत्र प्रेमा पोटी नांगी टाकल्याने महाविकास आघाडीत सरळ फूट पडली आहे.अध्यक्ष पदाची निवडणूक १४ रोजी असून अजून दोन दिवसाचा वेळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना असून विशेषतः नांदेड काँग्रेस ने पुढील राजकीय परिणामाचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस ला बिनशर्त पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी व्हावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वार्ड क्रमांक ६ चे नगर सेवक प्रतिनिधी रफिक सौदागर यांनी व्यक्त केले आहे.naned tej