महाविकास आघाडीतील नेत्यात समन्वयाचा अभाव; आघाडीत बिघाडी ची चर्चा!
माहूर:- माहूर नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी पर्यंत ही महाविकास आघाडीत सत्तेसाठी एकमत न झाल्याने आज दिनांक ८ रोजी माहूर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस – शिवसेने कडून अध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.

माहूर नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी ०७ काँग्रेस ०६ शिवसेना ०३ व भाजपा ०१ असे पक्षीय बलाबल आहेत.राज्यात माहविकास आघाडी सत्तेच्या स्थानी सल्याने माहाविकास आघाडीतील फॉर्म्युला च राज्यातील नगर पंचायत अध्यक्ष पदाच्या निवडी साठी राबविला जाणार असल्याचे या पूर्वी तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांनी संयुक्त पत्र काढून राज्यभर प्रसिद्धीला दिले होते,मात्र माहूर मध्ये सर्वाधिक सात जागा राष्ट्रवादी कडे असताना ६ सदस्य असलेल्या काँग्रेस ला अध्यक्ष पदाची लालसा पडल्याने राज्य भर माहाविकास आघाडी होत असताना माहूर मध्ये महाविकास आघडीला तळा जाण्याची चिन्ह आहेत.त्या मुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,शिवसेना,यां
नी स्वतंत्र नामनिर्देशन पत्र दाखल केले यात.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फिरोज दोसानी यांचा व शिवसेना कडून आशा ताई निरधारी जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला तर काँग्रेस कडून मात्र राजेंद्र केशवे व त्यांचे दाजी विलास भंडारे यांचा अशे दोन नाम निर्देशन पत्र दाखल झाले.राजेंद्र केशवे यांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करतांना नगर पंचायत कार्यालयात जिल्ह्यातील व तालुक्यातील काँग्रेस ची मोठी मंडळी हजर होती.मात्र त्यांचे दाजी विलास भंडारे यांचे नाम निर्देशन पत्र दाखल करतांना सूचक अनुमोदक शिवाय काँग्रेसचे माहूर तालुकाध्यक्ष व दोन स्थानिक नेते हजर होते,काँग्रेस चे पॅनल प्रमुख राजेंद्र केशवे यांची अनुपस्थिती या वेळी अनेकांना खटकली.एकूणच महाविकास आघाडीतील राज्यातील व जिल्ह्यातील मोठ्या नात्यात समन्वय नसल्याने की काय माहूर महाविकास आघाडी कडून अद्याप नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेले नाही.नामनिर्देशन पत्र परत घेण्याची शेवट ची तारीख ११ असल्याने येत्या तीन दिवसात ही महाविकास आघाडी च्या वरिष्ठ नेत्यांनी ठरलेल्या सूत्रानुसार योग्य तोडगा काढल्यास अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध ही होऊ शकते.कारण १७ पैकी १६ सदस्य महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस चे नेते तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण,आमदार अमर राजूरकर हे माजी आमदार प्रदीप नाईक व शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या शी चर्चा करून नैसर्गिक न्याय करतील अशी अपेक्षा दोन्ही घटक पक्षाला आहे.
