वाई बाजार च्या गोमाता यात्रेत बैलगाडा शर्यत….

माहूर:-  बैलगाडा शर्यतीला परवानगी मिलाल्यानंतर प्रथमचं माहूर तालुक्यात वाई बाजार येथील गोमाता यात्रेत भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे, बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमली होती.आई राजा उदो उदो , जय भवानी जय शिवाजी या घोषणा देत शेतकऱ्यांनी बैलगाडी स्पर्धेत भाग घेतला.अनेक वर्षांनी बैलगाडा शर्यती होत असल्याने  बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले.
माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील गोमाता यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.या यात्रेत दिनांक १७ व १८ मार्च रोजी आम जनरल व देणगी पावतीचा तान्हा अशा दोन गटात बैलगाडा शर्यत खेळविण्यात येणार आली. सदर स्पर्धेचे पहिले बक्षीस ३१ हजार ठेवण्यात आले होते,यात उतरत्या क्रमाने लाखोंची बक्षीसे स्पर्धकांसाठी ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत बैलगाडा मालकांनी आपल्या बैल गाड्या सह सहभाग नोंदविला.शेतकऱ्यांचा पारंपरिक असलेला बैलगाडा शर्यतीचा खेळ मागील आठ वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता.त्या मुळे या परिसरात शंकरपठ म्हणून प्रसिद्ध ह्या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा थांबल्या होत्या.आज शनिवार रोजी वाई बाजार येथील यात्रेत बैलगाडाची दोरी हातात धरून बैलगाडा शर्यतीचा आनंद शेतकऱ्यांनी अनुभवल्याने मिळालेल्या बक्षिसा पेक्षा त्यांचा आनंद हा अमूल्य असल्याचे जाणवत होते.या वेळी अनेक अबालवृध्द,शंकरपट शौकीन बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी उपस्थित होते.