सरकारी कर्मचाऱ्यांचा भजनाच्या माध्यमातून पेन्शन नाही तर मतदान नाही चा इशारा!

माहूर:- सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन च्या मागणी साठी रोज नवं नवीन पद्धतीने आंदोलन करीत आहेत,आज दिनांक १९ रविवार रोजी प्रशासकीय कार्यालय समोर भजन आंदोलन करण्यात आले.सरकारी कर्मचाऱ्यांनी भजनाच्या माध्यमातून पेन्शन नाही तर मतदान नाही चा इशारा दिला आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी माहूर तालुक्यातील  शेकडो कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. एकच मिशन..जुनी पेन्शन..पेन्शन नाही तर मतदान नाही…अशा घोषणा देत आज ग्रामसेवक संघटनेच्या महिला पदाधिकारी शारदा आळणे,वर्षा लंबे,डी.जी.फुलके,व्ही.एन.पाईकराव,आर.जे सरोदे,ए.आर.चौधरी अमोल टीपरसे, यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.नवीन योजना अन्यायकारक असून जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आणि सारे प्रशासन ठप्प झाले आहे.नवीन पेन्शन योजना अन्यायकारक आहे,असे संपकरी एकमुखाने बोलत आहेत.नो पेन्शन, नो व्होट, अशी घोषणाच आजच्या भजनाच्या माध्यमातून  ऐकायला मिळाली.या वेळी भाजना सह ” तूने हमको भिकारी बना दिया ही ” ही पेन्शन योजनेवर आधारित मिलिंद कंधारे या सहशिक्षकांने कव्वाली सादर करून भजन आंदोलनात रंगत भरली. या वेळी गौरख जगताप, आशिष माहुरे,स्वप्नील खांडेकर,जिचकार, राहुल ढवळे, एस.के.नरवटे, भाग्यवान भवरे,शीतल गौरखेडे, फॅन्सी नखाते,फरिदा नखाते, ए.एस.जाधव,मनोज वर्धे,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.