माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या संपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद!
किनवट:- किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना दिवसागणिक मजबूत व बलाढ्य होताना दिसत आहे. विविध पक्षातील तरुण,ज्येष्ठ कार्यकर्ते व महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात सामील होऊन घड्याळ हाती बांधत आहेत.आज दिनांक १४ मंगळवार रोजी किनवट तालुक्यातील जलधारा जिल्हा परिषद सर्कल मधील डोंगरगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांनी मा.आ.प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.या वेळी माजी आमदार नाईक यांनी ” ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है अशी गर्जना केली”.
माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली मागील महिन्या भरापासून सुरू असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क अभियान आज मंगळवार रोजी डोंगरगाव येथे पोहचले.या अभियानाला अबाल वृध्द व ज्येष्ठ नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश ही केला.यात वैजनाथ डाके, शिवाजी दुईके, भिमराव यरपे, तुकाराम साबळे, चरतरी वागतकर, पांडुरंग मेंडले, सय्यद जलाल, सुदाम वागतकर, सुनील डुरइकें, राजू मेंडके, शंकर धुमाळे, वसुदेव वागतकर, गोमाजी, गजानन वीजमवार, दत्ता मेंढे, हरइके, गणपत बागलकर, बालाजी डाके, गजानन धनवे, ईश्वरदास, संतोष हुइके, देवजी ढोलें, अशोक डुरके, कपील डाके, रामू हुरुके, ज्ञानेश्वर मेंढे, नामदेव धनवे, सुरेश हुदूके, पंडीत घुमा, बाबुराव धुमाळे, दत्ता डाके, रामकिशन, ऋषिकेश, अंकोश दुर, आतिश बुरकूले, शिवाजी वाक्याने, रामू मेटकर, रवि हुदूक, बालाजी भिसे, गोविंद धनवे, सुरेश हुदूके, गजानन डाके, यशवंता वागतकर, गोविंद साबळे, माधव डवरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, माजी सभापती अनिल पाटील, प्रदेश सरचिटणीस अजित साबळे, गजानन सोळंके पाटील, बाळू पवार,श्यामराव गुरुजी, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.