राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवकांनी सहभागी व्हावे:- फिरोज दोसानी

माहूर(सरफराज दोसानी):- नव्याने राजकारणात येऊ पाहणारी युवकांची संख्या लक्षणीय आहे, त्यांना राजकीय प्रक्रियेच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची ‘राष्ट्रवादी विचारांची’ व विकासात्मक दृष्टिकोन असणारी फळी नव्या जोमाने निर्माण करण्याच्या दृष्टीने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माहुर तालुक्यात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी वानोळा येथील सदस्य नोंदणी कार्यक्रमात दिली.
माहूर तालुक्यातील वानोळा येथे आज दिनांक १४ मंगळवार रोजी सदस्य नोंदणी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०० नवीन सदस्य नोंदणी झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची तर युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सरपंच मारोती रेकुलवार, उपसरपंच अभिजित राठोड, शहराध्यक्ष अमित येवतिकर यांची   प्रमुख उपस्थिती होती.
माहूर किनवट विधान सभा मतदार संघातील काना कोपऱ्यातील युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी जोडण्याचा माजी आमदार प्रदीप नाईक यांचा  मानस आहे.त्यातूनच तालुका पातळी व ग्रामीण भागातील गाव पातळी पर्यंत संघटनात्मक बांधणी करण्याचा एक व्यापक कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हाती घेण्यात आला आहे.गावपातळीपर्यंत सक्षम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन निर्माण करण्यासाठी युवकांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार असून युवक कार्यकर्त्यांनी या संघटनात्मक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे अहवान नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी यांनी केले.या वेळी मारोती रेकुलवार,अभिजित राठोड,अमित येवतिकर यांनी ही आपले मत व्यक्त केले.या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला वानोळा येथील कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.