माहूर(सरफराज दोसानी):- माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ११९८ लाभार्थी पैकी ९९८ लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा पहिला १५ हजार रुपयांचा हप्ता उचलला आहे.मात्र त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू केले नाही.लाभार्थ्यांनी घरकुल च्या कामाला सुरवात करावी त्यांना दुसरा ७५ हजाराचा हप्ता त्वरित अदा करण्यात येईल अशी माहिती गट विकास अधिकारी एस.जी.कांबळे यांनी दिली आहे.
एकीकडे आम्ही गरीब आहोत आम्हाला घरकुलासाठी शासकीय अनुदान द्या अशी ओरड असते तर दुसरीकडे घरकुल मंजूर होऊन देखील घरकाम केले जात नाही असे चित्र माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. शासनाच्या वतीने गरीब जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्याचा उद्देश म्हणजे गरीब जनतेला सुविधा मिळवून देणे असेच असते,मात्र एखादी योजना जर मंजूर झाली तर त्या योजनेचा त्या योजनेच्या निकषानुसार लाभ घेणे गरजेचे असते.परंतु काही लाभार्थी योजनेचा लाभ न घेता योजनेसाठी मिळालेलं पैसा इतर दुसऱ्याच नावाखाली खर्च करतात.याच उदाहरण म्हणजे माहूर तालुक्यात मंजूर झालेले ११९८ घरकुल होय,तालुक्यात पंतप्रधान अवास योजनेत २०० लाभार्थ्यांनी ही आपले घर पूर्ण केले नाही.९९८ लाभार्थ्यांनी तर पहिला हप्ता फस्त करून दकार मारली आहे.घरकुल मिळविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये खूप मोठी स्पर्धा बघावयास मिळते. परंतु जेंव्हा घरकुल बांधकाम करण्याची वेळ येते तेंव्हा मात्र पहिला हफ्ता मिळाल्यावर नंतर लाभार्थी टाळाटाळ करतांना दिसत आहे.त्यामुळे १ लाख ५० हजाराच्या अनुदानाची ही योजना केवळ १५ हजाराच्या अल्प लाभाताच अडकत आहे.या करिता लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू करावे त्यांना दुसरा ७५ हजाराचा हप्ता त्वरित देण्यात येईल असे अहवान गट विकास अधिकारी एस.जी कांबळे यांनी केले आहे.