जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक; तहसील कार्यालय समोर निदर्शने!

शाळा बंद,शासकीय कार्यालयात सुकसुकाट,आरोग्य व्यवस्था ही कोलमडली….!

माहूर(सरफराज दोसानी)- जुनी पेन्शन योजना मिळावी म्हणुन सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रामसेवक,आरोग्य विभाग, महसूल विभाग सह विविध संघटनेच्या माध्यमातून आज १४ मार्च पासुनच्या बेमुदत संपात माहूर तालुक्यातील ६५० सहभागी झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील अर्ध्यावर शाळा बंद आहेत, शासकीय कार्यालयात सुकसुकाट दिसून आला.आरोग्य कर्मचारी या संपात सहभागी असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णाची हेळसांड सुद्धा होत आहे.

हक्काच्या मागणी साठी परिवारासह सहभागी झालेले शिक्षकमाहूर तालुक्यातील विविध विभागातील कर्मचारी शिक्षक संघटना ,आरोग्य विभागाचे कर्मचारी आज मंगळवार रोजी जुनी पेन्शन योजना मिळावी म्हणून तहसील कार्यालयाच्या परिरसात एकत्रित आले.त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी केली.निदर्शने केली.तहसीलदार यांना निवेदन ही दिले.नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी ही या संपाची प्रमुख मागणी आहे.या वेळी शेकडो कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.या संपाचा मोठा परिणाम जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकीय शाळेवर झाला.तालुक्यातील अर्ध्यावर शाळा बंद असल्याचे आढळून आले.तर अत्यवश्यक असलेली आरोग्य सेवाही कोलमडली.संप किती दिवस चालणार हे अनिश्चित असेल तरीही याचा बऱ्याच प्रमाणावर शासकीय सेवेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले.या वेळी गोरख जगताप,राजेंद्र चारोळे,अरविंद जाधव, एस.एस.पाटील, के.डी. कदम, आशिष माहूरे, विजय घाटे,स्वप्नील खांडेकर, बापूराव माडगे,राहुल ढवळे, मुंडकर,प्रवीण वाघमारे, एस.बी. जिचकर, शिगनकार,चैतन्य उबाळे,कदम पाटील,मिलिंद खंदारे,भाग्यवान भवरे,फरीदा उपरीकर, एन.टी.खवसे,प्रिया निंभोळकर, एस.एस.लिमजे, शीतल गौरखेड,
आरोग्य विभागाचे मोहन सोनवणे, घनशाम काळे,दत्ता पालटवार, इ.आर.जुडे,मामिता कणाके,यांच्या सह तब्बल ६५० कर्मचारी संपात सहभागी झाले होते.
_____________________
देशातील राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली आहे. राज्याच्या अर्थभाराचे सुयोग्य नियोजन केल्यास जुनी पेन्शन बहाल करणे शक्य आहे हे वरील राज्य सरकारांनी दाखवून दिले आहे,मग महाराष्ट्र सरकार जुनी पेन्शन योजना का लागू करीत नाही.
गौरख जगताप
सह शिक्षक
जी.प.शाळा वडसा
________________________