माहूर:- माहूर चे पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांची बदली पोलीस कल्याण निधी मध्ये तर मांडवीचे सपोनी शिवरकर नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिनांक १८ रोजी २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.त्यात माहूर उपविभागातील मांडवी व माहूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.पोलीस निरीक्षक नितीन भास्करराव काशीकर यांची माहूर पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नितीन काशीकर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
माहूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक नामदेव लिंबाजी रिठ्ठे यांची बदली पोलीस कल्याण विभागात करण्यात आली आहे.तर मांडवी चे ठाणेदार मल्हारी दुर्गादास शिवरकर यांना नियंत्रण कक्षात बोलविण्यात आले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अधिनियम २०१५ मध्ये नमुद केलेल्या तरतुदीनुसार व जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकारास अनुसरुन नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील निःशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय जिल्हास्तरीय बदल्या केल्या आहेत.त्यात माहूर उपविभागातील माहूर येथील पोलिस निरीक्षक रिठ्ठे व मांडवी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवरकर यांचा समावेश आहे.