नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते नगर पंचायत कार्यालयात ध्वजारोहण!

माहूर(सरफराज दोसानी): संदेशे आते है….या देश भक्ती गीतावर जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील विद्यार्थिनींनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर पंचायत कार्यालयात ध्वजारोहण नंतर सादर केलेल्या नृत्याने व कराटे ग्रुप ने दाखविलेल्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

माहूर नगर पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आज गुरुवार रोजी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले.त्या नगर पंचायत च्या प्रांगणात शहरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले लेझिम नृत्य,कराटे पथकाचे प्रात्यक्षिक,विशेष आकर्षक होते.या वेळी मॉर्डन इंग्लिश स्कूल च्या संस्थापक अध्यक्ष अजीज सर व विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यात बहुमान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. 19 वर्षाच्या आतील क्रिकेट संघात माहूरचा क्रिकेट खेळाडू प्रतीक विकास टेकाम याची मेलिशिया व सिंगापूर दोऱ्यासाठी साठी निवड झाल्या बदल आणि स्वातंत्र्य दिनी पावसाची रिपरिप सुरू असताना सुद्धा आकर्षक रथ व देखावे सादर करत प्रभात फेरी लक्षवेधी करणारे जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे ,जागतिक दर्जाचे छायाचित्रकार रणजित वर्मा,रांगोळी कलाकार संजय अराध्ये,एम.बी.बी.एस.साठी पात्र ठरलेला हृषिकेश भारत पुरी या विद्यार्थ्याला आणि जिल्हा परिषद शाळेतील निवृत्त शिक्षक पंजाब शिंदे सर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.या वेळी उप नगराध्यक्ष नाना लाड,मुख्याधिकारी डॉ.राजकुमार राठोड,सभापती अशोक खडसे,विजय कामटकर,बिल्कीस बी अहमद आली,नगरसेवक आशाताई निरधारी जाधव, सौ.कांबळे, सारिका सिडाम,मसरत फातेमा, प्रा.राजेंद्र केशवे,कविता सौंदलकर, शकीला बी सय्यद,सागर राठोड,गोपू महामुने,शिला रणधीर पाटील,कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी,नगर सेवक प्रतिनिधी निरधारी जाधव, इरफान सय्यद,रफिक सौदागर, अप्सर आली,विक्रम राठोड,निसार कुरेशी,राजू सौंदलकर,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

समृद्ध व वैविध्यपूर्ण असलेल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आपल्याला नव्हे तर जगाला प्रिय आहे,त्यातच नगर पंचायत प्रांगणात संपन्न झालेल्या रंगारंग कार्यक्रमात जिल्हा परिषद केंदिय प्राथमिक शाळेच्या मुलींनी लेझिम नृत्यातून भारतीय संस्कृतीची महान परंपरा उभी केली तेव्हा उपस्थितांच्या नेत्रांची पारणे फेडली.तर कराटे चमू ने आपला कलाविष्कार सादर करत वाह वाह मिळविली.या वेळी लेझिम पथकाला रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित नागरिकांना या वेळी तंबाखू मुक्तीची व माझी वसुंधरा ची शपथ देण्यात आली.