राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी किनवट च्या अजित साबळे यांची निवड!

नांदेड:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक सेलच्या राज्य कार्यकारिणी किनवटच्या अजित साबळे यांना संधी देण्यात आली आहे.  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी अजित साबळे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र दिले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी चा विस्तार करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना अजित साबळे यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किनवट माहूर विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून युवक प्रदेश सचिव पदाची नियुक्ती सार्थ ठरविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारानुसार काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्याला आपले प्राधान्य असणार आहे.या विभागातील माजी आमदार प्रदीप नाईक व सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्ष संघटना वाढीस प्रोत्साहन देणार आहे.असे त्यांनी सांगितले.त्यांच्या निवडी बद्दल माजी आमदार प्रदीप नाईक ,
युवा नेते कपिल नाईक,जिल्हा बँक चे संचालक दिनकर दहिफळे,नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी, किनवट चे तालुकाध्यक्ष  प्रकाश गब्बा राठोड,माहूर तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, युवक चे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी,जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील जोमदे,युवक चे तालुकाध्यक्ष मारोती रेकुलवार, बालाजी बामणे,सुगत नगराळे रितेश कनाके यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निवडीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.