राष्ट्रीय महामार्ग लगत असलेले फुटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण काढले! नगर पंचायत व पोलीस विभागाची धडक मोहीम सुरू

माहूर:- शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात व किनवट मार्गावरील असलेले फुटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण मंगळवार रोजी नगर पंचायतच्या अतिक्रमण विरोधी पथकाने चोख पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुरूवात केल्याने दररोज या मार्गावर वाहतुकीचा होणारी कोंडी आता काही अंशी का होईना सुटणार आहे.

 

माहूर शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. महामार्गास अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण आज दिनांक १० रोजी नगरपंचायत व पोलिस 

प्रशासन यांच्या संयुक्त पथकाच्या साह्याने हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भारतीय स्टेट बँक ते ग्रामीण रूग्णाल पर्यंत संपूर्ण रस्ता हा अतिक्रमीत होता शहरातील महामार्गाचे रुंदीकरण व नुतणीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे अतिक्रमित रस्ता असल्याने रहदारीसह कामास अडथळा निर्माण होत असल्याने नगर पंचायत समिती अतिक्रमण हटाव मोहिम आखुन शहरातील रस्ता अतिक्रमण मुक्त केला या वेळी मुख्याधिकारी डॉ राजकुमार राठोड पोलिस निरीक्षक नामदेव रिठे साहायक पोलिस निरीक्षक आन्नासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक दराडे, छगण राठोड, विशाल ढोरे, दळवी,सुरेंद्र वाघ आदिंसह नगरपंचायत चे कर्मचारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.